Ladki Bahin January Installment Beneficiary List 2026: महाराष्ट्रातील लाखो भगिनी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या, तो क्षण अखेर जवळ आला आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या जानेवारी २०२६ च्या हप्त्याबाबत राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या नवीन शासन निर्णयानुसार (GR), निधी वितरणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
राज्य सरकारने जानेवारी महिन्याच्या प्रलंबित हप्त्यासाठी ९८.४५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
नवीन जीआरमध्ये सरकारने नियमावली अधिक कडक केली आहे. जर तुम्ही खालील दोनपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल, तर तुम्हाला ‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे मिळणार नाहीत:
सरकारने स्पष्ट केले आहे की, एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेता येणार नाही. अशा महिलांचे अर्ज आता तांत्रिक पडताळणीत बाद केले जातील.
तुमचा हप्ता मंजूर झाला आहे की नाही, हे पाहण्यासाठी खालील कृती करा:
जर तुम्हाला अजूनही हप्ता मिळत नसेल, तर खालील गोष्टी त्वरित तपासा:
अडचण असल्यास कुठे संपर्क साधाल? जर तुमचे सर्व कागदपत्रे बरोबर असूनही पैसे येत नसतील, तर तुम्ही हेल्पलाइन नंबर १८१ वर कॉल करू शकता किंवा आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधू शकता.









