Traffic Chalan Rules 2026: राज्य वाहतूक विभागाने रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच १ जानेवारी २०२६ पासून दुचाकी चालकांसाठी नवीन नियमावली लागू करण्यात येणार आहे. या नवीन नियमांनुसार दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा १० पटीने वाढवण्यात आली असून, नियम मोडणाऱ्यांवर थेट बँक खात्यातून दंड वसुलीची तरतूद करण्यात आली आहे.
वाहतूक विभागाने आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दंड वसुलीची प्रक्रिया बदलली आहे. रस्त्यांवरील हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे नियम मोडणाऱ्या गाड्यांच्या नंबर प्लेट स्कॅन करतील. हा दंड थेट तुमच्या गाडीच्या आरसी बुकवर (RC Book) नोंदवला जाईल आणि संबंधित दंडाची रक्कम तुमच्या बँक खात्यातून ऑनलाईन पद्धतीने कापली जाईल. जर बँक खात्यातून वसुली झाली नाही किंवा दंड प्रलंबित राहिला, तर पोलीस थेट घरी येऊन कारवाई करण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत हेल्मेट न वापरणाऱ्यांना केवळ १०० रुपये दंड भरावा लागत होता, त्यामुळे अनेक चालक या नियमाकडे दुर्लक्ष करत होते. मात्र, नवीन नियमानुसार हेल्मेटशिवाय गाडी चालवताना आढळल्यास १,००० रुपये दंड भरावा लागेल. इतकेच नाही तर, संबंधित चालकाचे ड्रायव्हिंग लायसन्स पुढील तीन महिन्यांसाठी निलंबित (Suspend) केले जाईल. ग्रामीण असो वा शहरी भाग, सर्वत्र हा नियम काटेकोरपणे लागू होणार आहे.
गाडी चालवताना केवळ लायसन्स असून चालणार नाही, तर गाडीचा वैध विमा (Valid Insurance) असणे अनिवार्य आहे. जर तुमच्याकडे इन्शुरन्स कागदपत्रे नसतील, तर तुम्हाला २,००० रुपये दंड आणि तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. नवीन वर्षात प्रवासाला निघण्यापूर्वी आपल्या गाडीचा विमा आणि पीयुसी (PUC) यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे अपडेट असल्याची खात्री करणे आवश्यक आहे.
गाडी चालवताना मोबाईलचा वापर करणे हे अपघातांचे प्रमुख कारण ठरत आहे. जर एखादा चालक एक हाताने गाडी चालवत मोबाईलवर बोलताना किंवा सिग्नल तोडताना आढळला, तर त्याला ५,००० रुपये दंड भरावा लागेल. शास्त्रज्ञांच्या मते, मोबाईलवर बोलण्यामुळे चालकाचे रस्त्यावरील लक्ष ५० टक्क्यांहून अधिक विचलित होते, ज्यामुळे भीषण अपघात होतात. हा धोका टाळण्यासाठी दंडाची रक्कम १० पटीने वाढवण्यात आली आहे.
मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांसाठी (Drink and Drive) नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. पहिल्यांदा या गुन्ह्यात सापडल्यास १०,००० रुपये दंड आणि सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची तरतूद आहे. जर दुसऱ्यांदा त्याच गुन्ह्यात चालक आढळला, तर दंडाची रक्कम १५,००० रुपये केली जाईल आणि तुरुंगवासाची शिक्षा दोन वर्षांपर्यंत वाढवली जाऊ शकते. अशा परिस्थितीत गाडी जप्त करण्याचे अधिकारही पोलिसांना देण्यात आले आहेत.
हा नियम पालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. १८ वर्षांखालील मुलांनी गाडी चालवल्यास पालकांना २५,००० रुपये इतका मोठा दंड भरावा लागेल. यासोबतच पालकांना तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते. संबंधित अल्पवयीन मुलाला वयाची २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स मिळणार नाही आणि गाडीची नोंदणी देखील एक वर्षासाठी रद्द केली जाईल.









